घरमहाराष्ट्ररंगपंचमी खेळणाऱ्यांनो सावधान; नाहीतर थेट तुरूंगात

रंगपंचमी खेळणाऱ्यांनो सावधान; नाहीतर थेट तुरूंगात

Subscribe

रंगपंचमीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस चौफेर नजर ठेवून असणार आहे.

राज्यभरात होळी आणि रंगपंचमी खेळण्यास सर्वत्र सुरूवात झाली आहे. परंतु होळी आणि रंगपंचमी साजरी करताना उत्साहाच्या भरात इमारतीच्या गच्चीवरून फुगे फेकणाऱ्याना थेट तुरूंगात जावे लागणार आहे. तर रंगपंचमीच्या दिवशी इमारतीच्या गच्चीचे दरवाजे बंद ठेवण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी ठाण्यातील नागरिकांना केले आहे. यासोबतच ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस चौफेर नजर ठेवून असणार आहे.

पोलिसांच्या पथकाची गस्त

रंगपंचमी खेळताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेषात असणाऱ्या पोलिसांचे विशेष पथक गस्त ठेवून असणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रंगपंचमीनिमित्त मनाई आदेश लागू करण्यात आला असून यात सार्वजनिक ठिकाणी असणारे झाडे व लाकडे तोडण्यास, जाळण्यास, दहन करण्यास मनाई, करण्यात आली आहे. यासोबतच रासायनिक रंगाचा वापर करण्यावर बंदी घालून रंगाचे-पाण्याचे फुगे किंवी पिशव्या फेकून मारल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी एखादयाची प्रतिष्ठा तसेच नैतिकतेला धक्का पोहोचेल, असे प्रकार करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

असे केल्यास तुरुंगाची हवा

रंगपंचमीच्या दिवशी घडणारे गैर प्रकार रोकावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या फेकणाऱ्यांना, अनुसूचित प्रकार करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. त्याचप्रमणे याकाळात दारू पिऊन वाहन चालवून अपघात होण्याची शक्यता अधिक असते त्याला आळा बसावा याकरिता ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई ही ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

होळी, धुलीवंदनसाठी ७०० पोलीस तैनात

कल्याणमध्येही १६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक ३० पोलीस निरीक्षक आणि ७०० पोलीस एसआरपी तुकडी आदींचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ पोलीस उपनिरिक्षक ५ कॉन्स्टेबल आणि २ महिला पोलीस आणि दोन गाडया अशी टीमही तैनात असणार आहे. शहरातील प्रमुख आठ पॉईंटवर नाकाबंदी असणार आहे. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. तसेच महिलांना, मुलींना पाण्याने, रंगाने भरलेले फुगे मारून वेठीस धरले जाते. त्यांच्यावरही पेालिसांची करडी नजर राहणार आहे.

घातक रंगामुळे अनेकवेळा त्वचेवर जखमा होतात. त्यामुळे दुकानदारांनी घातक रंग विक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेऊन हा सण साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -