जातीयवाद संपवायचा असेल तर जात संपवायला हवी -राज असरोंडकर

जातीय वाद समुळ नष्ठ करायचा असेल तर आधी इथली जात संपवावी लागेल

Mumbai

या देशात प्रत्येकाला आपली जात प्रिय असून त्याला त्याच्या जातीचा खुप अभिमान असतो. यातूनच तो वरच्या जातीचा, हा खालच्या जातीचा असा एक समाज मनावर आजही पगडा असून त्यातूनच जातीयवाद निर्माण होतो. हा जातीय वाद समुळ नष्ठ करायचा असेल तर आधी इथली जात संपवावी लागेल असे प्रतिपादन कायद्याने वागा या लोक चळवळीचे संस्थापक, पत्रकार राज असरोंडकर यांनी केले .१८ एप्रिल रोजी एस.टी.च्या कळवा ठाणे कार्यशाळेत झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे राज असरोंडकर म्हणून उपस्थित होते.

यावेळी, असरोंडकर म्हणाले, मला लाभलेली तुझी पाय वाट, झाली आता ती विकासाची वाट, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती या वामनदादा कर्डकांच्या गाण्याने असरोंडकर यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली. ज्या वामणदादां कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांवर भरभरून गाणी लिहीली व ती अजरामर झाली त्याच कर्डकांवर नंतरच्या काही वर्षीत, भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते, तलवारीच्या पात्याचे न्यारेच टोक असते. बाबाहेबांच्या विचारांची पायमल्ली पाहून या भावनाशील कवीला सगळी परिस्थिती पाहुन अतिशय उद्विग्न होऊन हे गाण लिहाव लागले.

नाहीतर अराजकता माजेल

या आंबेडकर जयंतीला निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. काँग्रेस ने ७० वर्षात काय केलं असा एक प्रश्न निर्माण केला जातो. काँग्रेसने या देशाच संविधान जिवंत ठेवलं पण प्रजासत्ताक पध्दतीने आपल मत कसं कस बनवलं पाहीजे ही प्रक्रिया तयार होऊ दिली नाही. मत द्यायचं असेल तर मत बनायला लागतं आणि तेच नेमक झालं नाही. बाबासाहेबांनी संविधान सभेच्या शेवटच जे भाषण केल ते प्रत्येकाने वाचल तर अस लक्षात येईल की, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देश हा नेमका काय आहे . गुंतागुंतीचे मुद्दे काय आहेत या बाबतीत ठळकपणे सविस्तर मांडणी केलेली आहे. राज्य घटनेप्रमाणे वागणारे लोक जर नसतील तर मात्र अराजकता माजेल अशीच परीस्थिती आज निर्माण झाल्याचे असरोंडकरांनी यावेळी म्हटले.

समावेशक संविधान देशाला दिले

आज काल फेसबुकवर महापुरुषांच्या विटंबनेचे व्हिडिओ पाहिले की मनाला यातना होतात. वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात सामाजिक विषमतेचे चटके सहन केले. एवढा विद्वत्ता असलेला महापुरुष पण बडोदा संस्थानात काम करताना शिपायांनी फाईल हातात न देता ती फेकून देण, मागासवर्गीय असल्याने रहायला घर न मिळण, हे सर्व बाबसाहेबांनी अनूभवले. एका जिन्या खाली हा जगविख्यात तत्वज्ञानी यामुळे ढसाढसा रडला होता. पण, ज्यावेळी संविधान बनवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सूरुवात केली, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही आकस ठेवला न ठेवता एक सर्व समावेशक असं संविधान या देशाला दिले ते समजून घेतले पाहिजे.