घरमहाराष्ट्रमोखाडा तालुक्यात रेती माफियांचा उच्छाद

मोखाडा तालुक्यात रेती माफियांचा उच्छाद

Subscribe

मोखाडा तालुक्यातील अनेक नदीतून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुुरु आहे. भरदिवसा रेती चोरी केली जात असताना प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. यात रेती माफियांशी अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे. मोखाडा तालुक्यातील नदी पात्रातून रेती उत्खनन करण्याची राज्य सरकारकडून कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. उलट नदीतून रेती काढण्यास मनाई आहे. असे असताना मोखाडा तालुक्यातील देवबांध नदी, बधल्याचा पाडाची नदी व सेंड्याची मेटची नदी पात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे.

सर्व नदी पात्रातून रेती काढून माफियांनी नदीतच रेतीचे मोठे मोठे ढिग केले आहेत. रात्रीच्या अकरा ते पहाटे चार वाजताच्या सुमारास ही रेती ट्रॅक्टर व लॉरीतून विविध ठिकाणी विकण्यासाठी नेली जाते. सदरचा प्रकार महसूल आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत होत असताना त्यावर कारवाई केली जात नाही.

- Advertisement -

मोखाडा तालुक्यात रेती काढण्यासाठी कुठलीच परवानगी देण्यात आलेली नाही आहे. बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करून वाहतूक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– श्री. मुंदडा, नायब तहसिलदार, मोखाडा

मोखाडा तालुक्यात रासरोसपणे रेती व्यवसाय केला जातो मोखाडा महसूल विभाग व पोलीस प्रशासन कुठल्याच रेती वाल्यांवर कारवाई करताना दिसत नाही या रेती वल्याना अभय कोणाचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
– सुरेखा साळवे, सामाजिक कार्यकत्या, मोखाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -