घरमहाराष्ट्रकरुणा नावाच्या महिलेसोबत सहमतीनेच संबंधात होतो - धनंजय मुंडे

करुणा नावाच्या महिलेसोबत सहमतीनेच संबंधात होतो – धनंजय मुंडे

Subscribe

उच्च न्यायालयात प्रकरण धनंजय मुंडेंचा खुलासा!

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील एका महिलेने मुंबई पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल करण्याबाबत मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका फेसबुकद्वारे मांडली आहे. भाजपने मात्र धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisement -

मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

याबाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यमावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतःहून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत

कालपासून समाज…

Posted by Dhananjay Munde on Tuesday, 12 January 2021

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -