राजीव गांधी यांनीच विखे पाटलांना पाडण्यास सांगितले होते – जयंत पाटील

१९९१ साली काँग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारीचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे विखे पाटील दक्षिण अहमदनगरमधून अपक्ष उभे राहिले होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप घेतला असून शरद पवार यांनी चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य केले असल्याचा आरोप केला. यावर आता जयंत पाटील यांनी नवीन खुलासा केला आहे.

Mumbai
Rajiv Gandhi
माजी पंतप्रधान राजीव गांधी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य केले असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना जयंत पाटील म्हणाले की, पवार यांनी फक्त १९९१ च्या निवडणुकीत काय घडले हे सांगितले होते. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसने दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे तिकिट कापले होते. त्यामुळे विखे पाटील दक्षिण अहमदनगरमधून अपक्ष उभे राहिले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला पाहीजे, असे आदेश शरद पवार यांना दिले होते. राजीव गांधी यांच्या आदेशानुसारच पवार यांनी काम केले असल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

हेही वाचा –राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस निष्ठा सिद्ध करावी

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव

गडाख यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव झाला होता. ही जुनी घटना पवार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत सांगितली. अहमदनगरच्या जागेवरून फक्त घडलेल्या घटनेचा दाखला दिल्याने कुणाचाही अपमर्द होत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पहिल्या १२ फमेदवारांची यादी जाहीर

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्यावतीने पहिल्या १२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी अहमदनगरच्या जागोवरून सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तसेच ‘विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात प्रचार करणार नसल्याचे जाहीर केलेले असले तरी नगरच्या जागेचा निर्णय राष्ट्रवादीने पुर्ण विचारांती घेतलेला आहे. विखे पाटील मतदारसंघात आघाडीचा प्रचार करणार नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत जाहीर प्रचार करणार आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते नगरमध्ये जाहीर सभा घेतील’, असे सुतोवाच जयंत पाटील यांनी केले.


हेही वाचा – नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here