घरमहाराष्ट्रचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करणार

चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करणार

Subscribe

प्रथम टप्प्याकरिता ८८८ पदांची निर्मिती करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेत अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी प्रथम टप्प्याकरिता ८८८ पदांची निर्मिती करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन १२० कोटी रुपये तर राज्य शासन ३० कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. सध्या औरंगाबाद येथील बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे.
लातूर आणि अकोला येथील महाविद्यालयाच्या इमारती पूर्ण झाल्या असून कोविड उपचारासाठी त्या वापरात आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयांमध्ये हृदयरोगचिकित्सा, शल्यचिकित्सा, मुत्र पिंडचिकित्सा, मुत्र रोगशल्यचिकित्सा, मज्जातंतु शल्यचिकित्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा असतील.

- Advertisement -

या रुग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात वर्ग-१ चे ३४, वर्ग-२ चे ३८, वर्ग-३ नियमित ३८८ तसेच बाह्यस्त्रोतांने २८, वर्ग-४ कंत्राटी ३४४ आणि विद्यार्थ्यांची निवासी पदे अशी ८८८ पदे भरण्यात येतील. यासाठी ४२ कोटी ९९ लक्ष २३ हजार ५६८ रुपये असा वार्षिक खर्च येईल.


हेही वाचा – बार कौन्सिलची सदस्य नोंदणी शुल्क कमी करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -