घरताज्या घडामोडीCorona : अवघ्या २० दिवसांत जळगावातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Corona : अवघ्या २० दिवसांत जळगावातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Subscribe

तिघांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली; विरहाने वयोवृध्दाला हदयविकाराचा झटका

कोरोनाच्या आजाराने आता कुटुंबच्या कुटूंब उद्धस्त होत असल्याचे उदाहरणेही समोर येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील साखरे गावात तर एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा अवघ्या २० दिवसांत मृत्यू झाला. यातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर घरातल्यांच्या मृत्यूच्या विरहाने याच कुटुंबातील ८५ वर्षाच्या वृध्दाचा हदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडला.
धधरणगाव तालुक्यातील साखरे येथे अमृतकर कुटूंबातील सदस्य एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने राहत होते. शेती आणि खत विक्रीच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदनिर्वाह होत होता. एकत्र कुटुंब असल्याने तेरा सदस्य आनंदात राहत होते. परंतु नियतीने घाला घातला. कोरोनाने अवघ्या वीस दिवसांत होत्याचे नव्हते करुन टाकले. कुटुंबात शांताराम गोपाल अमृतकर (वय ७५) यांना प्रथमत: कोरोना सदृश आजार झाल्यावर त्यांचे निधन झाले. त्यानंतर सुनील पुंडलिक अमृतकर (वय ५२) व सतीश पुंडलिक अमृतकर (वय ५०) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांची प्राणज्योत मालवली. आधी भावाचा आणि त्यानंतर दोन्ही मुलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घरातील वयोवृद्ध पुंडलिक गोपाल अमृतकर (वय ८५) यांचेही हदयविकाराने निधन झाले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कर्ते पुरुष अवेळी गेले-

कुटुंबातील पुंडलिक गोपाल अमृतकर यांचे २ ऑक्टोबरला, शांताराम गोपाल अमृतकर यांचे ८ सप्टेंबरला, सुनील पुंडलिक अमृतकर यांचे ३० सप्टेंबरला तर सतीश पुंडलिक अमृतकर यांचे १ ऑक्टोबरला निधन झाले. कुटुंबातील जबाबदार माणसे अवेळी गेल्याने कुटुंबाची घडी विस्कटली आहे. शेती, व्यवसायासाठी बँका, विविध कार्यकारी सोसायटी, उसनवार असे कर्ज देखील या कुटंबावर आहे. अशावेळी घरातील महिला, लहान मुले हा भार कसा पेलतील असा यक्षप्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात नाशकातही तिघा भावांनी गमावला प्राण

जळगावच्या घटनेपूर्वी नाशिक शहरातही कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा एकापाठोपाठा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. पंचवटीतील मधुबन कॉलनीत राहणार्‍या भोळे कुटुंबातील सर्व भावंडांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता. या कुटुंबात प्रथमत: विलास भोळे (वय ६२) यांना करोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोच त्यांचे सख्खे धाकटे बंधू प्रल्हाद भोळे (वय ६०) यांचे तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी वसंतराव भोळे (वय ६७) यांचे करोनामुळे निधन झाले.

- Advertisement -

 

Corona : अवघ्या २० दिवसांत जळगावातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -