Coronavirus: गावकऱ्यांनी घेतला मुंबईकरांचा धसका; गावाबाहेर लावले प्रवेशबंदीचे फलक

गावाबाहेर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत.

Mumbai
no entry board
Coronavirus: गावकऱ्यांनी घेतला मुंबईकरांचा धसका; गावाबाहेर लावले प्रवेशबंदीचे फलक

मुंबईत करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकांनी करोनाचा धसकाच घेतला आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मुंबईकरांनी गावाकडची वाट धरली आहे. मात्र, मुंबईवरुन येणाऱ्या लोकांचा गावकऱ्यांनी मुंबईकरांचा धसका घेतला आहे. गावकऱ्यांनी मुंबईकरांना गावी येऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच गावाबाहेर प्रवेश बंदीचे फलक देखील लावले आहेत.

 

सध्या करोनाच्या भीतीने मुंबईकर कुटुंबासमवेत कोकणची वाट धरली आहे. मुंबईत संचारबंदी लागू केली असताना मुंबईकर गावाकडे पळू लागले आहेत. सोमवारी रात्री कशेडी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या सर्वांची प्रशासकीय यंत्रणेद्वारे तपासणी करत त्यांची माहिती नोंदवून घेतली. तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यानंतरच त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.


हेही वाचा – CoronaVirus : आता तर हद्दच झाली; पोलीस आयुक्तांच्याच नावाने अफवा!

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शहरातून येणाऱ्या लोकांना अडवू नका, त्यांना गावात प्रवेश द्या, असे आवाहन केले आहे. मात्र, असताना देखील गावातील लोकांनी मुंबईकरांना गावात प्रवेश बंदी केली आहे. बाहेरच्या लोकांनी गावात येऊ नका आणि गावातील लोकांनी बाहेर जाऊ नका, असे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here