घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा मंदिरावर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा मंदिरावर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी येथील शीतळा देवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी मंदिरातील दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून आता देवच सुरक्षित राहिलेले दिसत नाहीत. शहरातील पिंपरी येथील शीतळा देवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी मंदिरातील दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेला आहे. याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी फिर्याद दिली असून १५ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट आहे. दरम्यान, सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पिंपरी पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत.

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी टेहळणी करून मंदिरातील दानपेटी आणि चांदीचा मुकुट पळवला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुचाकीवरून दोन जण आलेल्या पैकी एकाने अगोदर मंदिर परिसरात पाहणी केली आणि त्यानंतर मुख्य मंदिराच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून आत प्रवेश करत दानपेटी आणि १५ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट लंपास केला आहे. चोरी केल्यानंतर दोघे जण दुचाकीवरून फरार झाले आहेत. या घेटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या – संजय राऊत

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी, अक्कलकोट, शेगांवात भाविकांची अलोट गर्दी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -