घरताज्या घडामोडीCorona: पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; दिवसभरात ११०० नवे रुग्ण; तर ३९ रुग्णांचा...

Corona: पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; दिवसभरात ११०० नवे रुग्ण; तर ३९ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात आज दिवसभरात १ हजार १०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात १ हजार १०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. तर ३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज अखेर २ हजार ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१ लाख ५३२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ५३२ झाली असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला १५ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.


हेही वाचा – धक्कादायक! वेळेवर उपचार न घेतल्याने ८० टक्के मृत्यू; पालिकेकडून मृत्यूंचे विश्लेषण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -