घरमहाराष्ट्रचित्रपटकर्मींच्या पेंशनसाठी मंत्रीमहोदय करणार प्रयत्न

चित्रपटकर्मींच्या पेंशनसाठी मंत्रीमहोदय करणार प्रयत्न

Subscribe

नुकतेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हवामान बदलामुळे देशात अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर विषयावर केंद्र सरकार राज्याशी समन्वय साधून लवकरच नवे धोरण करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी प्रकाश जावडेकर बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सर्व पदाधिकारी, संचालक व सभासद तसेच नामवंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, टेक्निशियन, निर्माता आणि दिग्दर्शक आदि मान्यवर उपस्थितीत होते.

काय म्हणाले जावडेकर

चित्रपट निर्मिती क्षेत्रात अनेक लोकं काम करतात ते असंघटित आहेत. या सर्वासाठी केंद्र सरकारने जी पेंशन योजना आणली आहे. ती आता सर्वांसाठी उपयोगी होईल. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेऊन सर्वांची पेंशनची कामे पूर्ण करून घ्यावी. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन द्यावे, मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असेही जावडेकर यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – 

बॅलेट नाही ‘ईव्हीएम’च; राज ठाकरेंच्या मागणीला निवडणूक आयोगाचा खो

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री दिसणार सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -