घरमहाराष्ट्रकरोनामुळे रोरो सेवा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द

करोनामुळे रोरो सेवा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा हस्ते आज उद्घाटन

भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सुरू होणार्‍या बहुचर्चित रो रो सेवाच्या आज होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम करोना विषाणूचे प्रभावामुळे रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज रविवारी सेवेचे उद्घाटन होणार होते. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. लोकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊ नये, सार्वजनिक कार्यक्रम टाळावे, अशा सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होईल की नाही, याविषयी शंका उपस्थित करण्यात येत होती. यामुळे आता ही रो रो सेवा लोकांना उपलब्ध होण्यासाठी थोडा विलंब लागणार आहे.

चीनमध्ये हाहा:कार माजविण्यारा करोना आता भारतासह मुंबईत शिरला आहे. या करोनाचा मोठा धोका रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक आणि आता जल वाहतुकीला आहे. रविवारी होणार्‍या रोरो सेवेच्या उद्घघाटन कार्यक्रमावरसुध्दा या करोनाचे सावट होंते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या. अनेक मान्यवरांना आणि प्रसार माध्यामाना निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र करोनाच्या प्रभावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबई महानगराला जोडणार मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान ही सेवा असणार आहे. यासाठी 125 कोटी खर्चून यासाठी मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे, तर मुंबईतील भाऊचा धक्का येथेही टर्मिनल उभारण्यात आले आहे. जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रोटोपोरस नामक बोट मागील महिन्यात मुंबईतील अरबी समुद्रात दाखल झाली.

रोरो बोटची वैशिष्ठ्ये
– एकाच वेळी 50 वाहने आणि 200 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता
– रस्त्याने तीन तासांच्या प्रवासाऐवजी 45 मिनिटांचा प्रवास शक्य
– मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टळून वेळेची बचत होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -