CoronaVirus: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली!

Mumbai
corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत वाढत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १२५ वरून १३१वर पोहोचला आहे. सांगलीत तीन, कोल्हापुरमध्ये दोन आणि पुण्यात एक अशाप्रकारे एकूण सहा नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकडेवारी आणखीन भर पडला आहे. आतापर्यंत राज्यात करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील ५ , मुंबईतील १२ आणि संभाजीनगरमधील येथील एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. गुरुवारी संध्याकाळ सदर महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अल्पवधीतच त्या महिलेचा मृत्यू झाला. नेमके कारण आम्ही तपासत आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

तसंच गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेने टंडन हॉस्पिटल, डी.वाय.पाटील हॉस्पिटल अशा दोन हॉस्पिटलमधून उपचार घेतले. त्यानंतर, वाशी येथील जनरल हॉस्पिटलमध्ये २४ मार्चला अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली. त्याच दिवशी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन बुधवारी स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 

पिंपरी चिंचवड मनपा – १२ 
पुणे मनपा – १९ 
मुंबई – ४९ 
सांगली – १२ 
नवी मुंबई – ६
कल्याण डोंबिवली – ६ 
नागपूर – ५ 
यवतमाळ – ४ 
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी – ३ 
सातारा, पनवेल, कोल्हापूर प्रत्येकी – २ 
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी – १


हेही वाचा – CoronaVirus: बापरे! केरळमध्ये वेगाने वाढतोय करोनाग्रस्तांचा आकडा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here