घरमहाराष्ट्रक्या बात है! त्यांनी चक्क लग्नातच केलं भारत-पाक सामन्याचं प्रक्षेपण!

क्या बात है! त्यांनी चक्क लग्नातच केलं भारत-पाक सामन्याचं प्रक्षेपण!

Subscribe

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याची क्रेझ सगळीकडेच पाहायला मिळत आहे. पण पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क एका लग्नात सुद्धा या सामन्याची क्रेझ पाहायला मिळाली!

क्रिकेट हा भारतीयांचा दुसरा धर्म आहे असं म्हणतात. आणि ते अजिबात खोटं नसल्याचे पुरावे वारंवार देत असतात. तसाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. इथे भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचं थेट प्रेक्षपण एका भल्या मोठ्या स्क्रीनच्या साहाय्याने चक्क विवाह सोहळ्यातच करण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड मधील एका मंगल कार्यालयात हा विवाह समारंभ पार पडला. पौर्णिमा उर्फ श्रद्धा राक्षे आणि अजिंक्य धावडे हे यावेळी विवाह बंधनात अडकले. पण त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ऐन सामन्याच्या दिवशीच आला. हा योगायोग अजिबात न चुकवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. येणारे वऱ्हाडी आणि पाहुणे मंडळी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मुकू नयेत, म्हणून हा सर्व थाट करण्यात आला होता!


हेही वाचा – भारत वि. पाकिस्तान..20 साल बाद!

कसा जुळून आला योग?

आजच्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी पिंपरी-चिंचवडमधील राक्षे आणि धावडे यांचा विवाह समारंभ होता. त्यांनी सोशल मीडियाद्वारे लग्नाच्या पत्रिका आपल्या परिजनांपर्यंत पोहोचवल्या. पत्रिका छापल्या नसल्याने फेसबुक आणि व्हाट्सअॅपची मदत घेत मित्रांना फोटो पोस्ट केले होते. पत्रिकेत विशेष टीप म्हणून ‘भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येईल’, असं देखील नमूद केलं होतं. हे सर्व पाहता विवाह सोहळ्यास तब्बल तीन हजार पाहुणे मंडळी आले होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चक्क विवाह सोहळ्यातच मोठी स्क्रीन लावली होती. त्यावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं थेट प्रेक्षपण करण्यात आलं होतं. क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. त्यात भारत-पाकिस्तान सामना म्हटल्यानंतर अधिकच उत्सुकता असते. त्यासोबतच लग्न ही आयुष्यातली फार महत्त्वाची घडामोड असते. आणि इथे तर या दोन्ही गोष्टींचा एकत्र संयोग जुळून आला होता. हे लग्न नवरा आणि नवरी अशा दोन्हीकडच्या मंडळींना कायम लक्षात राहील हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -