हिंदी चीनी भाई भाई 2.0

Delhi
india china bhai bhai
भारत चीन दरम्यान करोनाविरोधात लढण्यासाठी चर्चा

भारतात करोनाने आपला विळखा घट्ट केला असतानाच आता भारत आणि चीन दरम्यान करोनाविरोधातील लढा लढण्यासाठीची चर्चा सुरू झाली आहे. जगभरात १७ हजार लोकांचा बळी घेतलेल्या करोनाविरोधातील लढाईसाठी चीनने भारताला सहकार्य करावे, संयुक्तपणे या करोनाविरोधातील लढाई लढण्यासाठीचे आवाहन भारताने चीनला केले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक ट्विट करताना माहिती दिली आहे की त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्यासोबत नुकतीच एक चर्चा केली आहे. या चर्चेनुसार करोनविरोधातील लढाईसाठी दोन्ही देशांकडून द्विपक्षीय पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. आगामी जी२० परिषदेच्या निमित्तानेही आज चर्चा करण्यात आली. भारताने याआधी चीनला मदत करतानाच मदतकार्यासाठी आवश्यक अशा गोष्टींचा पुरवठा चीनच्या हुबेई प्रांतासाठी केल्या होत्या. भारत आणि चीन मधील मजबुत मैत्रीपुर्ण संबंधांचा संदेश यामधून देण्यात आला होता.

भारतातले चीनचे राष्ट्रदूत सन वेइडिंग यांनीही ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले की दोन्ही मंत्र्यांनी करोनाविरोधातील लढाईत एकमेकांविरोधात सहानभूती दर्शवतानाच एकतेचाही आदर्श दाखवून दिला. चीन आता या संपुर्ण करोनाविरोधातील लढाईतला आपला अनुभव भारतासोबत चर्चा करणार आहे. तसेच आपल्या अनुभवाची देवाणघेवाणही करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. चीन आपल्या क्षमतेनुसार भारतासाठी विविध गोष्टींच्या पुरवठ्यासाठी बाजारपेठ खुली करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here