घरदेश-विदेशभारतातील पहिला 'ऑनलाईन प्लेटलेट दाता' समुदाय

भारतातील पहिला ‘ऑनलाईन प्लेटलेट दाता’ समुदाय

Subscribe

डेंग्यूच्या विषाणूमुळे रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण वेगाने घसरते, त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव देखील होतो. काही वेळा, प्लेटलेटचे प्रमाण २०,०००/cu.mm, पर्यंत घटते, तेव्हा अशा रूग्णांच्या शरीरात तातडीने प्लेटलेट संक्रमण (transfusion) करावे लागते. मात्र प्लेटलेटस तात्काळ मिळत नाहीत. परंतु आता 'ऑनलाईन प्लेटलेट दाता' समुदायामुळे हे शक्य होणार आहे.

भारतात डेंग्यूमुळे आरोग्याला सध्या फार मोठा धोका निर्माण झाला आहे. डेंग्यू जर संपूर्ण शरीरात पसरला तर त्याचा परिणाम हा ‘लाल प्लेटलेट्स’ म्हणजे ‘रक्तपेशीं’वर होऊन त्या कमी होतात. प्लेटलेटच्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रूग्णाला ‘प्लेटलेट संक्रमण’ करणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊन देशातील पहिला ‘ऑनलाईन देशव्यापी प्लेटलेट दाता समुदाय’ तयार करण्यात आला आहे. यासाठी गोदरेज एचआयटी आणि अपोलो रूग्णालयाने पुढाकार घेतला आहे.

आता प्लेटलेट्स ऑनलाईन मिळवा

या उपक्रमाचा एक भाग म्हणून अपोलो रूग्णालयातर्फे गंभीर असणाऱ्या डेंग्यूच्या रूग्णांना प्लेटलेटचा पुरवठा केला जाणार आहे. हा ऑनलाईन प्लेटलेट दाता समुदाय, म्हणजे प्लेटलेट दान करणारा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त दात्यांनी नोंदणी केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला आणि त्या माध्यमातून डेंग्यूच्या आजारात प्लेटलेट आणि त्यांच्या दानाच्या महत्वाबाबत ५ दशलक्ष नागरिकांना जागरूक करण्यात आले आहे.

- Advertisement -

डेंग्यूसारखा भयंकर आजार भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, प्लेटलेट दाता समुदाय विकसित करण्याच्या उद्देशाने अपोलो रूग्णालयाने गोदरेज एचआयटी सोबत हात मिळवणी केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच डेंग्यूच्या रूग्णांच्या साहाय्यासाठी आवश्यक ते स्रोतही उपलब्ध करून देणार आहोत. डेंग्यूच्या रुग्णांसाठी अपोलो रूग्णालयातर्फे २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. त्याचवेळी डेंग्यूच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांसाठी दाता समुदाय उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.  – संगिता रेड्डी, अपोलो रुग्णालयाच्या संयुक्त-व्यवस्थापकीय संचालक

वर्षभरात १ लाखांपेक्षा जास्त डेंग्यूचे रुग्ण

गेल्या वर्षभरात देशात डेंग्यूचे १ लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी २४५ दुर्दैवी रूग्ण मृत्युमुखी पडले. मुख्य कारण म्हणजे डेंग्यूवर ठाम असा इलाज नाही आणि त्याची लक्षणे पाहून त्यानुसार उपचार करावे लागतात. डेंग्यू का होतो? हे लोकांना ठाऊक आहे, मात्र त्यावर उपचार कशा प्रकारे करावे? याबाबत जनजागृतीचा अभाव आहे. डेंग्यूच्या विषाणूमुळे रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण वेगाने घसरते, त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. तसेच इतर गुंतागुंतही वाढते. काही वेळा, प्लेटलेटचे प्रमाण २०,०००/cu.mm, पर्यंत घटते, तेव्हा अशा रूग्णांच्या शरीरात तातडीने प्लेटलेट संक्रमण (transfusion) करावे लागते. रक्ताप्रमाणे प्लेटलेट पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठवता येत नाहीत. त्यामुळे अशावेळी दाता उपलब्ध होणं ही कठीण असतं.

- Advertisement -

वाचा – २०१८ डेंग्यू, मलेरियाचं, राज्यात सर्वाधिक मृत्यू

वाचा – तीन वर्षांत डेंग्यूचे रुग्ण वाढले, दररोज ३ जणांना होते लागण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -