घरमहाराष्ट्रइंदोरीकर महाराज म्हणतात, 'मी घरी थांबलोय, तुम्हीही बाहेर पडू नका'!

इंदोरीकर महाराज म्हणतात, ‘मी घरी थांबलोय, तुम्हीही बाहेर पडू नका’!

Subscribe

पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी आता राम कृष्ण हरी म्हणत, करोनासंदर्भातील लढाईत सक्रीय होत ‘आपलं गाव, आपलं शहर आणि आपला देश’ करोनामुक्त करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

इंदोरीकर महाराजांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करत ‘गाव, शहर आणि देश जर करोनामुक्त करायचा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणं गरजेचं आहे. हा कोणा एकट्या-दुकट्याचा वा निव्वळ शासन, प्रशासनाचा नव्हे तर आपणा सर्वांचा लढा आहे. राज्यात ६४ करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सतर्क होत, खबरदारी घेण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करा. आपण आणि आपलं कुटुंब करोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका. प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या’, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

‘मी पण घरी आहे, तुम्हीपण घराबाहेर पडू नका’

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या चाहत्यांना आणि समाजाला या पत्राद्वारे एक संदेश दिला आहे. ते म्हणतात, ‘मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका, शासनाला सहकार्य करा, वारंवार हात स्वच्छ करा’.

३१ मार्चपर्यंतचे कार्यक्रम केले रद्द

दरम्यान, इंदोरीकर यांच्या किर्तनाच्या पुढील काही तारखा बुक झालेल्या आहेत. इंदोरीकरांनी ३१ मार्चपर्यत राज्याच्या विविध भागातील आपले नियोजित किर्तनाचे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळाली.


हेही वाचा – …म्हणून अमृता फडणवीसांनी दिला इंदुरीकरांना सल्ला!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -