घरताज्या घडामोडीइंदोरीकर महाराजांचा खुलासा, 'मी तसं बोललोच नाही!'

इंदोरीकर महाराजांचा खुलासा, ‘मी तसं बोललोच नाही!’

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या गर्भलिंगनिदानासंदर्भातल्या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ सुरू असून त्यावर अखेर खुद्द इंदोरीकर महाराजांची भूमिका समोर आली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवली होती. त्याला बुधवारीच इंदोरीकर महाराजांनी उत्तर देखील दिलं होतं. अखेर, त्यातली त्यांची भूमिका समोर आली असून, ‘माध्यमांमध्ये सुरू असलेलं अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही’, असं इंदोरीकर महाराजांनी आपल्या खुलाशामध्ये सांगितलं आहे. ‘आपलं महानगर’ने सर्वात आधी इंदोरीकर महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वृत्त दिल्यानंतर हा सगळा वाद पेटला होता.

काय म्हणाले इंदोरीकर महाराज?

आपल्या खुलाशामध्ये इंदोरीकर महाराज म्हणतात, ‘वाद सुरू असलेलं वाक्य मी बोललोच नाही. असं किर्तन मी केलेलंच नाही. किंबहुना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात किर्तन केलेलंच नाही. मी तर समाज प्रोधनाचं काम करत असल्यामुळे मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याशिवाय, इतर ठिकाणाहून देखील मला पुरस्कार मिळाले आहेत. व्हिडिओचं म्हणाल, तर युट्यूबला आम्ही कोणताही व्हिडिओ टाकत नाही किंवा माझ्या किर्तनाचं रेकॉर्डिंग देखील करत नाही’, असं इंदोरीकर महाराजांनी आपल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, इंदोरीकर महाराजांचा खुलासा आपल्यापर्यंत आला असून त्यांच्याविरोधातील पुरावे आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी म्हटलं आहे. ‘सम तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगा तर विषम तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगी होते’, असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यावरून राज्यभर खळबळ उडाली होती. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. ‘आपलं महानगर’ने दिलेल्या वृत्तानंतर हा प्रकार उघड झाला होता.


हेही वाचा – सिंधूताई सकपाळांचा इंदोरीकर महाराजांना पाठिंबा, म्हणाल्या…!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -