घरमहाराष्ट्रमी निवडणूक लढवणार नाही - इंदुरीकर महाराज

मी निवडणूक लढवणार नाही – इंदुरीकर महाराज

Subscribe

काल संगमनेर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत इंदुरीकर महाराज सामिल झाले होते. त्यामुळे इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार का? म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.

“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती म्हणून याचा राजकीय अर्थ न काढण्याची विनंती” ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केली आहे. काल संगमनेर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत इंदुरीकर महाराज सामिल झाले होते. त्यामुळे इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार का? म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. पण आता इंदुरीकर महाराजांनी स्वतःहून राजकारणात प्रवेश न करता समाजसेवा करणार असल्याचे म्हणत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

काल संगमनेर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मी केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी मी यात्रेला भेट दिली. ही राजकीय भेट नव्हती. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजसेवेचा घेतलेला वसा मी शेवटपर्यंत पुढे नेणार आहे. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार नाही. म्हणूनच कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा खुलासा प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोपर पुलावरील वाहतूक रविवारपासून बंद!

राजकीय प्रवेशाबाबत चर्चा तथ्यहीन

संगमनेर येथे महाजनादेश यात्रेत इंदुरीकर महाराज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे इंदुरीकर महाराज भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराज यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना धनादेश सुपूर्द करुन कोणत्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता मी कार्यक्रमातून निघालो. मला राजकारणात उतरायचे असते तर मी कार्यक्रम संपेपर्यंत तिथे थांबलो असतो. समाजसेवेचे व्रत हाती घेतल्याने मी कधीही राजकारणात जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या बातम्या तथ्यहीन असल्याचे त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -