घरमहाराष्ट्रपिंपरीचा कुख्यात गुंड मध्यवर्ती पोलिसांच्या जाळ्यात; दोन रिव्हॉल्वर,एक चाकू जप्त

पिंपरीचा कुख्यात गुंड मध्यवर्ती पोलिसांच्या जाळ्यात; दोन रिव्हॉल्वर,एक चाकू जप्त

Subscribe

निवडणुकीच्या काळात दहशत माजवण्यासाठी हे गुन्हेगार कोणत्या पक्षाने मागवले होते, याचा तपास पोलीसांकडून सुरू

पिंपरी चिंचवड पोलिसांना मकोका अंतर्गत हवा असलेल्या रफिक शेख सह तीन जणांना गजाआड केले आहे. निवडणुकीच्या काळात दहशत माजवण्यासाठी हे गुन्हेगार कोणत्या पक्षाने मागवले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. येत्या सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांचे आदेशाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू आहे. गस्तीवर असलेले पोलीस उप निरीक्षक योगेश गायकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तडवी, पोलीस हवालदार संजय सुर्वे, भुंडेरे, बनसोडे, चौधरी, ठाकुर, चव्हाण, पाटील, गावीत याना एका इसमाने सहा संशयीत इसमाबाबत माहीती दिली.

कुख्यात गुंडांवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

पोलीस पथकाने सायंकाळच्या सुमारास मिलेट्री तलाव मैदान जवळ येथे जाऊन रफिक उर्फ काल्या सलिम शेख, पप्पू उर्फ किरण अरूण म्हेत्रे, निलेश बुध्दरत्न खडसे यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचेकडुन एक रिव्हॅालवर, दोन जिवंत राउंड, एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, एक चाकू आणि एक मिरची स्प्रे व हजार रूपये ताब्यात घेतले. त्यांचे तीन साथीदार पळुन जाण्यात यशस्वी झाले आहेत. हे गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

१४ गुन्हे दाखल असणारा गुंड पोलिसांच्या जाळ्यात

२९ वर्षीय रफिक उर्फ काल्या सलिम शेख हा पिंपरीचा राहणारा आहे. याचेवर एकुण १४ गुन्हे दाखल असुन तो चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजी न. ३०६/२०१९ भादवी कलम ३९४, ३४१, ३४ सह मोक्का कायदा कलम ३ (१) (पप), ३ (२), ३ (४) या गुन्हयात फरार आहे. तसेच पप्पू उर्फ किरण अरूण म्हेत्रे याचेवर वेगवेगळया पोलीस स्टेशनला चार गुन्हे व निलेश बुध्दरत्न खडसे याचेवर एक गुन्हा दाखल असल्याची माहीती पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली आहे.


मग पुन्हा येऊ नका आमच्याकडे – राज ठाकरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -