पालिकेचे कर्मचारी खातायत अळ्या!

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कॅन्टीनमधल्या जेवणात अळी सापडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

Pimpri Chinchwad
insect in canteen food
जेवणात निघाली अळी

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कॅन्टीनच्या जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेतील काही व्यक्तींनी महानगर पालिकेच्या कॅन्टीन मधून राईस प्लेट मागवली होती. त्यात बटाट्याची भाजी होती. अचानक जेवण सुरू असताना भाजीत मृत अवस्थेत अळी आढळल्याने सर्वांनी जेवण थांबवले. या प्रकारामुळे पालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पुणे महानगर पालिकेत येणारे पत्रकार देखील याच ठिकाणाहून जेवण मागवत असतात.

जेवण झाल्यावर शेवटी सापडली अळी

सविस्तर माहिती अशी की, ‘श्रीमंत महानगर पालिका म्हणून एकेकाळी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची ओळख आहे. मात्र, याच महानगर पालिकेच्या कॅन्टीनमध्ये मागवलेल्या राईस प्लेटमध्ये अळी निघाली आहे. महानगर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नेते जेवण मागवत असतात. आज देखील पालिकेतील काही व्यक्तींनी कॅन्टीन मधून राईस प्लेट मागवली होती. सर्वांनी जेवण केलं, बटाट्याची शाक भाजी आवडल्याने सर्वांनी त्याच्यावर ताव मारला. मात्र अगदी शेवटच्या क्षणी भाजीत अळी आढळली. यामुळे संबंधित व्यक्तींनी याची तक्रार कॅन्टीन व्यवस्थापकांना केली. त्यांनी ऐकून शहानिशा करत जेवणात अळी निघाल्याचे मान्य केले. संबंधितांवर कारवाई करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

खरंतर असं व्हायला नको. याची शहानिशा करण्यासाठी मी कॅन्टीनमधल्या स्टाफशी बोलेन. ही नक्कीच चुकीची घटना आहे.

प्रमोद थोरात, कॅन्टीन व्यवस्थापक