अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

Mumbai
avani tigress

विदर्भातील नरभक्षक टी-१ वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनीश अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी-१ वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात मार्गदर्शकतत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

हे वाचा – अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली होती. अनेक प्राणीप्रेमींनी रस्त्यावर उतरून आपला निषेध प्रकट केला होता. त्यातच भाजपच्याच केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी तर थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि मेनका गांधी यांच्या वाक् युद्ध रंगलेले पाहायला मिळाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही अवनीच्या शिकार प्रकरणावर भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेलाही भाजपवर टीका करण्याची आयती संधी लाभली. सामनाच्या अग्रलेखातून याप्रकरणी भाजपला चांगलेच घायाळ केले गेले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी पुर्ण चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आता चौकशी समितीची घोषणा झाली आहे.

अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here