घरमहाराष्ट्रआयटीतला हायटेक इंग्रजी शेतकरी, इंग्रजी भाज्यांमधून वार्षिक ६ कोटी रुपयांचे उत्पन्न

आयटीतला हायटेक इंग्रजी शेतकरी, इंग्रजी भाज्यांमधून वार्षिक ६ कोटी रुपयांचे उत्पन्न

Subscribe

या व्यवसायात पत्नीची मोठी साथ असल्याचं आवर्जून जयसिंग सांगतात. जयसिंग थोरवे अस या शेतकर्‍याचे नाव असून पत्नी मालन थोरवे यांची त्यांना खंबीर साथ मिळते. या दोघांनी आधुनिक शेती केली आहे.

एका अवलीयने आयटीमधील चकचकीत काचेच्या इमारतीत आपली भाजी विकायची असे स्वप्न पाहिले होते.तेच स्वप्न आता सत्यात उतरवले असून आयटी क्षेत्रातील मोठंमोठ्या कंपनीसह देश विदेशात ते इंग्रजी भाजी विकतात. यामधून वार्षिक ६ कोटी रुपये मिळत असून खर्च वजा करता त्यांना १ कोटींचा फायदा होत आहे.

या व्यवसायात पत्नीची मोठी साथ असल्याचं आवर्जून जयसिंग सांगतात. जयसिंग थोरवे अस या शेतकर्‍याचे नाव असून पत्नी मालन थोरवे यांची त्यांना खंबीर साथ मिळते. या दोघांनी आधुनिक शेती केली आहे. याचा फायदा अनेक शेतकर्‍यांना त्यांनी करून दिला आहे. यावर्षीचा आधुनिक शेती संबंधीचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालन थोरवे यांना मिळाला आहे.त्यामुळे पंचक्रोशीत थोरवे कुटुंबाचे नाव मोठे झाले आहे.

- Advertisement -

जयसिंग थोरवे हे लहान असतानाच आजी सोबत भाजी विकायला जात होते. इयत्ता तिसरीमध्ये असताना त्यांना भाजीपाला लागवडीचीआवड निर्माण झाली. त्यांनी यात मन लावून स्वतः झोकून दिले. यामुळे त्यांना व्यवहारीक ज्ञान मिळाले. ग्राहकांशी कस बोलायचे, त्यांना आपल्या शेती उत्पादनाचे महत्त्व कसे पटवून द्यायचे याची माहिती त्यांनी घेतली.

आयटी हबमध्ये, आधी नोकरी मग भाजी विक्री

आत्ये बहिणीच्या हिंजवडी जवळील गावाला जयसिंग गेले होते. त्यावेळी त्यांना हिंजवडी आयटी हबचे उंच उंच आणि चकचकीत इमारतींचे कुतूहल वाटले. या अशा इमारतीमध्ये आपली भाजी विकायला हवी, असे त्यांनी मनोमन ठरवले. यासाठीआयटी पार्कमधील इमारतीत प्रवेश मिळवणे गरजेचे होते. त्यातूनही त्यांनी अनोखा अविश्वसनीय मार्ग काढला. आयटी क्षेत्राशी निगडित कोर्स केले आणि एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. कालांतराने ती कंपनी बंद पडली. २००८ साली त्यांचा विवाह हा मालन यांच्याशी जमला होता. नोकरी गेल्याची माहिती फोनवरून मालन यांना दिली. यावर मालन यांनी आपल्याकडे शेती आहे मग चिंता कशाला, असा धीर त्यांना दिला. पुढे २००९ साली दोघांचा विवाह झाला.
आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर तेथील कर्मचार्‍यानां इंग्रजी भाजी आवडत असल्याचे थोरवे यांना समजले होते. इंग्रजी भाज्यांची माहिती काढण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या मित्राची मदत घेतली. जयसिंग यांनी आपल्या १२ एकर जमिनीत थेट इंग्रजी भाज्यांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केले. त्यांना यात यश आले. आज मोठमोठ्या कंपनीत, मॉलमध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या इंग्रजी भाज्या विकल्या जात आहेत. यातून त्यांना भरपूर पैसे मिळायला लागले. या इंग्रजी भाज्यांच्या लागवडीविषयी मालन यांनी इतर दोनशे शेतकर्‍यांना याचे प्रशिक्षण दिले. शेतकर्‍यांना प्रशिक्षित करून त्यांना भाज्यांचे उत्पन्न घेण्यास सांगितले. सोबतच त्यांना बाजार पेठ मिळवून देण्याचा काम जयसिंग करतात. जयसिंग यांच्याकडे तब्बल ३७ प्रकारच्या इंग्रजी जातीच्या भाज्या आहेत, यात रेड कॅबेज,आईस बर्ग, रोमिनो, चेरी टोमॅटो यांचा समावेश आहे. यातून शेतकर्‍यांना एकरी साडेचार लाख रुपये मिळतात. यामुळे शेतकरही आनंदी आहे.

- Advertisement -

मंत्रालयाजवळ तीन तासांत १ लाखांचे उत्पन्न

२०१६ साली अवघ्या तीन तासांत तब्बल १ लाख १३ हजारांचे उत्पन्न इंग्रजी भाज्यांनी मिळवून दिल्याचे जयसिंग थोरवे सांगतात. मुंबई येथील मंत्रालयाच्या तिथे भाज्या विकल्याचे ते म्हणाले. थोरवे यांचं शिक्षण हे बी.ए झाले आहे. तसेच त्यांनी औंध येथे सरकारचा आय.टी.आय. कोर्स केलेला आहे.

थोरवे यांच्या इंग्रजी भाज्या भारतातील गोवा,दिल्ली, बेंगलोर,हैद्राबाद येथे जातात. तर दुबई,युरोप,रशिया परदेशात देखील जातात. या सर्वांमधून थोरवे कुटुंबाची उलाढाल तब्बल ६ कोटी एवढी आहे. यातून खर्च वजा करता १ कोटी रुपये मिळतात. कुटुंबात ऐकून दहा सदस्य आहेत. भावाला खाजगी नोकरी होती. मात्र ती सोडायला लावत त्यांनी त्याला देखील या इंग्रजी भाज्यांच्या व्यवसायात सहभागी करून घेतले आहे. दुष्काळ आणि शेतात उत्पन्न मिळत नाही म्हणून मराठवाडा,विदर्भ येथे शेतकरी आत्महत्या करतात. थोरवे यांचे यशोगाथा पाहिल्यास शेतात सोनं उगवता येतं, हेच इतर शेतकर्‍यांनी शिकल पाहिजे. जेणेकरून आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

कृष्णा पांचाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -