घरमहाराष्ट्रमतदानावर पावसाचे सावट

मतदानावर पावसाचे सावट

Subscribe

मुंबईसह राज्यभरात येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट आहे. २१ तारखेला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी पाऊस पडल्यास निवडणूक आयोगाची चांगलीच तारांबळ उडाण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाळा विलंब झाल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीला जोरदार पावसाचा अनुभव नागरिकांनी घेतला. मात्र त्यानंतर पाऊस गायब होत उन्हाचा कडाका अधिकच वाढला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकीचा प्रचार दणक्यात सुरू झाला. ऑक्टोबर हीटचा सामना करत प्रचाराचाही पारा काही दिवसांत वाढत गेला. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना शुक्रवारी झालेल्या पावसाने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई उपनगरात सकाळी झालेल्या तुरळक सरींमुळे अनेक उमेदवारांना आपला सकाळच्या सत्रातील प्रचार आटपता घ्यावा लागला. त्या

- Advertisement -

तच शनिवारी मुंबईसह कोकणामध्ये मुसळधारा तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्याता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवसावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान खात्याचा अंदाच अचूक ठरल्यास शेवटच्या दिवशी काढण्यात येणार्‍या प्रचार फेर्‍या पावसामध्ये वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत शुक्रवारी तुरळक पाऊस पडला. मात्र कोकणात जोरदार पाऊस झाला. तसेच मध्य महाराष्ट्रातही पाऊस झाला आहे.

मतदानाच्या दिवशी गडगडाटासह वादळ
शनिवारबरोबरच रविवारीही हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र पावसाचा कोणताही अंदाज वर्तवला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -