येणारे ४ ते ५ दिवस जोरदार पावसाचे

कोकण, मुंबई तसेच परिसरात जोरदार पाऊस पडणार

rain
पाऊस

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे जोरदार पुनरआगम ऑगस्टच्यापहिल्याच आठवड्यात होणार आहे. त्यामुळे सध्या गायब झालेल्या पावसाचे जोरदार कमबॅक येत्या दिवसांमध्ये अनुभवता येईल.पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे. पुढील आठवड्याकसोमवारपासून जोरदार पावसाला सुरूवात होईल. तसेच घाट भागात तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभानेवर्तवली आहे.

पुढच्या 4,5 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता. सोमवार पासून जोरदार. घाट भागात पण अतीमुसळधारची शक्यता आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंदहोसाळीकर यांनी दिली. येत्या 3 ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान अति मुसळधार ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पालघर, ठाणे, मुंबई तसेच मुंबई परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये पडू शकतो. ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान हलका ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मध्य महाराष्ट्रातील सातार्‍यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. अशात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे दिलासा मिळू शकतो.विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात शेती कामांसाठी शेतकरी कामाला लागले आहेत.

जलसाठा
१ ऑगस्ट २०१९ मध्ये ८६.९० टक्के
१ जुलै २०१८ मध्ये ८३.४६टक्के
१ ऑगस्ट २०२० रोजी फक्त सुमारे ३४.६३टक्के