घरमहाराष्ट्र'ही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची'

‘ही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची’

Subscribe

पुलवामा हल्ल्यानंतर देशभर श्रद्धांजली वाहिली गेली. असे असताना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज फेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभर श्रद्धांजली वाहिली गेली. सर्वांनी मुठी आवळल्या. तेव्हा मनापासून असं वाटलं की पिंपरी- चिंचवड लगतच्या पुण्यातील लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानाच्या भर फौजेत घुसून त्यांना अद्दल घडवणारे महाराज, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात तशा अॅक्शन घेतल्या जातील, अशी अपेक्षा एक शिवभक्त म्हणून करतो, असं स्वराज्यरक्षक संभाजी महाराज फेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधनात बोलत होते. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यावर आसूड ओढले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला. ते म्हणाले की, सत्ता असताना सत्तांध न होणं, हा महाराजांनी सर्वात पहिला आदर्श घालून दिला. आजच्या काळात हे अनेकांना लागू पडत असेल. सत्ता हातात असताना माणसानं कधी सत्तांध व्हायचं नसतं, रयतेच्या कल्याणाच राज्य राबवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधन पर्वात ते बोलत होते. तेव्हाच महाराजांच्या आदर्शाची आठवण करून देत, रयतेच्या कल्याणाच राज्य राबवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आणि सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -