घरताज्या घडामोडीजैन समाजाचे कार्यकर्ते नेमिचंद राका यांचे निधन

जैन समाजाचे कार्यकर्ते नेमिचंद राका यांचे निधन

Subscribe

नाशिक ः जैन समाजाचे कार्यकर्ते नेमिचंद नेनसुख राका यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एन. राका अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक नितीन राका, सुवर्णा लोढा (अहमदनगर) व मीना छाजेड (पिंपळगाव बसवंत) या दोन विवाहित कन्या, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते धार्मिक वृत्तीचे होते. अनेक वर्षांपासून महावीर जयंतीचे कार्यक्रम संपन्न करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

पत्रकारिता क्षेत्रात काम करताना नाशिक जिल्हा पत्रकार संघामध्ये ते क्रियाशील होते. त्यांनी तीन वर्षे जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार म्हणून उत्तम काम केले होते. त्यांनी ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस,. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जैन सोशल ग्रुप मेन, सकल जैन सेवा संघ, निमाणी मंगल कार्यालय, जैन ओसवाल बोर्डींग आदी संस्थांवर विविध पदे भूषविली. त्यांचा स्वभाव विनोदी व हजरजबाबी होता. सर्वांची मने सांभाळतांना ते स्वतः नम्र राहत असत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -