‘टीका करणारी शिवसेना मोदींच्या मिठीत कशी शिरते?’

लोकसभा निवडणूक २०१९च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चाळीसगावातल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

Jalgaon
uddhav thackery
उध्दव ठाकरे

पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर १८ एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. चाळीसगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेमध्ये यावेळी शिवसेना-भाजप युतीवर जोरदार टीका झाली. ‘गेली पाच वर्ष मोदींवर टीका करणारी शिवसेना मोदींच्या मिठीत कशी काय शिरते?’ अशा शब्दांत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेवर परखड टीका केली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी चाळीसगावमध्ये जाहीर सभा पार पडली.

‘एकमेकांची गचांडी धरून नवा आदर्श’

दरम्यान, यावेळी जळगाव भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राड्यावरून देखील टीका करण्यात आली. ‘जळगावच्या भाजपने देशापुढे एक नवा धडा घालताना एकमेकांची गचांडी धरण्याचे काम जनतेपुढे केले’, असं जयंत पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वी जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच जिल्ह्यातल्या वाघ आणि पाटील गटामध्ये हाणामारी झाली होती. यावेळी गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की झाली होती.


हेही वाचा – राणेंसोबत शिवसेना सोडून मूर्खपणा केला – माजी आमदाराची खंत

नोटबंदीमध्ये देशाची सर्व बाजूंनी लूट

‘नोटाबंदीनंतर कमीशनवर नोटा बदलण्याचे काम झाले. देशाला सर्व बाजूने लुटण्याचे काम झाले आहे,’ असा थेट आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला. ‘भाजपाने सामदामदंड भेद या मार्गाने काम करण्याची भूमिका घेतली आहे’, असंही पाटील यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here