घरमहाराष्ट्रकसला हा संताप? जयंत पाटलांनी मतमोजणी केंद्रावरच पत्रकाराला भडकावली!

कसला हा संताप? जयंत पाटलांनी मतमोजणी केंद्रावरच पत्रकाराला भडकावली!

Subscribe

जयंत पाटील यांनी रायगडमधल्या एका मतमोजणी केंद्रावर जाऊन एका पत्रकाराला थेट कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल एकीकडे भाजपला स्पष्ट बहुमताच्या दिशेने नेत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी महाराष्ट्रात भाजपला चांगलंच आव्हान देत विजय खेचून आणला. रायगडमधून सुनील तटकरेंनी अनंत गितेंचा पराभव करत सेना-भाजपचा वारू अडवला. मात्र, यावेळी मतमोजणी केंद्रावर कव्हरेजसाठी आलेल्या पत्रकाराला शेकापचे जयंत पाटील यांनी थोबाडात लगावली आणि नवा वाद निर्माण झाला. सुनील तटकरेंचा विजय त्यांना सहन न झाल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हर्षद कशाळकर असे या पत्रकाराचे नाव असून जयंत पाटील यांनी दोनदा त्याच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे, थेट मतमोजणी केंद्रात जाऊनच त्यांनी हा प्रकार केल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

jayant patil
शेतकरी कामगार पक्ष, आमदार जयंत पाटील

काय आहे पार्श्वभूमी?

मागील २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या रमेश कदम यांनी सुनील तटकरेंचा पराभव केला होता. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असणाऱ्या रमेश कदम यांनी सुनील तटकरेंचा अवघ्या २१०० मतांनी पराभव केला. त्यावेळी सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवारामुळे सुनील तटकरेंना मोठा फटका बसला होता. यंदा देखील रायगड मतदारसंघामधूनच राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसोबतच आणखीही २ सुनील तटकरे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. मात्र, आधीच्या अनुभवातून अंदाज आलेल्या सुनील तटकरेंनी यावेळी अधिक काळजी घेतली. त्यामुळे इतर अपक्ष सुनील तटकरेंना ९ हजार आणि ४ हजार अशी अनुक्रमे मतं घेतली. आणि सुनील तटकरेंना सुमारे पावणे पाच लाख मतांनी विजय मिळाला.

- Advertisement -

हेही वाचा – इतिहास! तब्बल ४८ वर्षांनंतर खासदार रिपीट

का मारलं असावं जयंत पाटलांनी?

दरम्यान, यावेळी सुनील तटकरेंचा दणदणीत विजय झाल्यामुळे संतापलेल्या जयंत पाटलांनी रागाच्या भरात पत्रकारावर हात उचलला असावा, अशी चर्चा आता स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप जयंत पाटील किंवा संबंधित पत्रकाराकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -