घरमहाराष्ट्र'गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील हे अंतराळ तंत्रज्ञानी'

‘गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील हे अंतराळ तंत्रज्ञानी’

Subscribe

'गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील हे अंतराळ तंत्रज्ञानी', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड म्हणाले आहेत. गिरीश बापट यांनी काल ट्विटरवर अँटिसॅटेलाईट मिसाईलचे अंतराळातील परिक्षणासंदर्भात चुकीची माहिती टाकली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

‘गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील हे अंतराळ तंत्रज्ञानी आहेत’, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. भारतीय वैज्ञानिकांनी बुधवारी अँटिसॅटेलाईट मिसाईलचे अंतराळात यशस्वीपणे परीक्षण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सर्व वृतवाहिन्यांसमोर येऊन वैज्ञानिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. परंतु, या कामगिरीविषयी पूर्ण माहिती न मिळवता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ट्विटरवर चुकीची माहिती टाकली. ‘भारतावर टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाला भारताने उपग्रह विरोधी मिसाईल वापरुन नष्ट केले’ असे बापट यांनी ट्विटरवर म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी गिरीश बापट यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गिरीश बापट यांच्यासोबतच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरदेखील आव्हाडांनी टीका केली आहे. ‘या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्क वर सत्कार करायला हवा’, असे आव्हाड म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी हॅशटॅग बिनडोक चौकीदार वापरले आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, ‘गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तानचे यान पाडले असा दावा केला. या दोघांना महाराष्ट भूषण देऊन शिवाजी पार्क वर सत्कार करायला हवा.’

- Advertisement -

नेमके काय होते गिरीश बापट यांच्या ट्विटमध्ये?

गिरीश बापट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अँटिसॅटेलाईट मिसाईलचे अंतराळातील परिक्षणासंदर्भात माहिती टाकली होती. त्यांच्या या ट्विटवर नेटीझन्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. गिरीश बापट हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. परंतु, तरीही त्यांच्याकडून अशी चूक होणे, लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया नेटीझन्सकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

आव्हाडांच्या ट्विटनंतर नेटीझन्सचीसुद्धा टीका

जितेंद्र आव्हाड यांनी टीका केल्यानंतर नेटीझन्सनेही गिरीश बापट आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी यांनी सर्व माध्यमांसमोर येऊन बोलण्यापेक्षा वैज्ञानिकांनी समोर येऊन सांगणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांनामध्ये व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -