उदयनराजेंना लोकशाही माहीत नाही, ते अजूनही सरंजामशाहीतच – जितेंद्र आव्हाड

Baramati
Jitendra Awhad and Udaynraje Bhosale

साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकशाही माहीत नाही, त्यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच आहे, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बारामती येथे केले आहे. उदयनराजे हे महाराज आहेत, आम्ही सामान्य प्रजा आहोत, त्यामुळे ते आम्हाला मारू शकतात, अशी उपरोधिक वक्तव्य करत आव्हाड यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. आज बारामतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आव्हाड यांनी बारामतीमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन यादव यांची घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजेंवर टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here