घरमहाराष्ट्रजे. जे हॉस्पिटलचे हृदय सर्जन डॉ. अनिल कुमार निवडणुकीच्या रिंगणात

जे. जे हॉस्पिटलचे हृदय सर्जन डॉ. अनिल कुमार निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

दक्षिण मुंबई जिल्हा लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे गेले ३० वर्षे जे.जे आणि बॉम्बे हॉस्पिटलमधील हृदयसर्जन डॉ. अनिल कुमार लोकसभेची निवडणूक लढवत आहे. राजकारणात समाजकारण आणायचे असल्यास स्वच्छ चारित्र्य आणि समाजाशी नाळ जुळलेल्या उच्च शिक्षित लोकांनी निवडणूक लढवली पाहिजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन या निवडणुकीला ते सामोरे जात आहे.

कोण आहेत डॉ. अनिल कुमार?

डॉ. अनिल कुमार गेली ३० वर्षे जे.जे. हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून १९८८ साली जे.जे. हॉस्पिटलमधील पहिली अँजियोप्लास्टी त्यांनी केली असून हृद्यरोगविकार क्षेत्रातील पहिली शस्त्रक्रिया केली. आरोग्य क्षेत्रातील अनेक वैद्यकीय विक्रम डॉ. अनिल कुमार यांच्या नावावर आहेत. १०२ वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीला त्यांनी पेसमेकर बसवला आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही सर्जरी फारच दुर्मिळ समजली जाते. ११९३ मध्ये त्यांनी अवघ्या १७ दिवसांच्या बाळावर अँजियोप्लास्टी केली होती आणि ही दुर्मिळ घटना असून अशी सर्जरी भारतामध्ये प्रथमच पार पडली होती. डॉ अनिल कुमार यांच्या आरोग्यक्षेत्रातल्या योगदानामुळे त्यांना कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने २००१ साली अध्यक्ष बनवले होते. तसेच २००५ ते २००९ साली एशिया पॅसिफिक सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या अध्यक्षपदाचा प्रथम भारतीयाचा मान डॉ. अनिल कुमार यांना मिळाला आहे. अनेक जगप्रसिद्ध संस्थांनी डॉ. अनिल कुमार यांना फेलोशिप दिली आहे. प्राध्यापक आणि मानद प्राध्यापक म्हणून ते आजही उत्साहाने भारतातील अनेक हृदयरोग आणि त्या संबंधित काम करणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण देत आहेत.

- Advertisement -

 

गेली ३० वर्षे खासगी आरोग्य क्षेत्रात काम करत असताना डॉ. अनिल कुमार यांनी समाजातील गोर गरीब आणि तसेच महागडे उपचार न परवडणाऱ्या वंचित घटकासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. आजपर्यंत अशा पन्नास हजारहून अधिक नागरिकांना त्यांनी उपचार दिले आहेत. जे.जे. हॉस्पिटलमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आसाम आणि इतर राज्यातून येणाऱ्या रुग्णांची रीघ लागलेली असते.

- Advertisement -

डॉ. अनिल कुमार वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते मार्डचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे या निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला जनता स्थान देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -