घरमहाराष्ट्रकाका जोशींच्या उमेदवारीचा काँग्रेसला अधिक फटका

काका जोशींच्या उमेदवारीचा काँग्रेसला अधिक फटका

Subscribe

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीने शड्डू ठोकले आहेत. आघाडीकडून कुणबी समाजाचे मारुती ऊर्फ काका जोशी रिंगणात उतरणार आहेत. कुणबी समाजाला जोशी यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळणार असल्याने त्याचा फटका प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीने शड्डू ठोकले आहेत. आघाडीकडून कुणबी समाजाचे मारुती ऊर्फ काका जोशी रिंगणात उतरणार आहेत. या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे मतदार असून ते विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरलेले आहेत. कुणबी समाजाला जोशी यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळणार असल्याने त्याचा फटका प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे. कुणबी समाजाचे नेते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अशा दुहेरी भूमिकेतून जोशी यांच्या उमेदवारीचा काँग्रेस आघाडीला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून काँग्रेस आणि युती अशा दोघा प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आहे. कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाच्या मतदारांचे प्रबल्य आहे. ही कुणबी समाजाची ‘व्होट बँक’ विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरलेली असली तरी तिचा फायदा घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून कुणबी समाजाचे काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित आघाडीच्या फायद्यापेक्षा त्याचा अन्य राजकीय पक्षांना अधिक तोटा होण्याची शक्यता आहे. जोशी राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाड यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेची आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी लाड काँग्रेसऐवजी वंचित आघाडीचे काका जोशी यांच्या प्रचाराला जाणार का, याबाबत उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -