घरमहाराष्ट्रथायलंडमध्ये कळसुत्री बाहुल्यांचा गाजावाजा

थायलंडमध्ये कळसुत्री बाहुल्यांचा गाजावाजा

Subscribe

जगभरातील २९ देशांमधील १६१ कलाकारांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. भारतातून महाराष्ट्र, कोलकाता, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान राज्यातील कलाकारांनी आपली कला सादर केली.

थायलंडमध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलमध्ये दिनेश साळूंखे यांच्या कळसुत्री बाहुल्यांच्या प्रयोगाने प्रेषकांना भूरड घातले. प्रेषकांनी या प्रयोगाचे खूप कौतुक केले. हा फेस्टिव्हल १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत थायलंडच्या फुकेट या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमात जगभरातील २९ देशांमधील १६१ कलाकारांनी सहभाग घेतला. भारतातून महाराष्ट्र, कोलकाता, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान भागातील कलाकारांनी आपली कला सादर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दिनेश साळूंखे यांच्यासोबतच महाराष्ट्राचे ख्यातनाम पपेट कलाकार रामदास पाध्ये, सत्यजीत पाध्ये आणि अर्पणा पाध्ये यांनी देखील सहभाग घेतला.

कोण आहेत दिनेश साळुंखे?

दिनेश साळुंखे हे जळगावच्या चोपडा तालुक्यातील शिक्षणशास्त्र विद्यालयातील कलाशिक्षक आहेत. त्यांनी थायलंडच्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये भारताचा झेंडा फडकावत परेडमध्ये सहभाग घेतला. या परेडमध्ये त्यांनी कळसुत्री बाहुल्यांची कला सादर केली. त्यांनी याअगोदर पोलंड देशातही कळसुत्री बाहुल्यांचा प्रयोग केला होता. साळूंखे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून ही कला जोपासली असून त्याचे विविध प्रयोग त्यांनी केले आहेत. बेताच्या परिस्थितही त्यांनी आपली कलेविषयीची आस्था जिवंत ठेवत आंतरराष्ट्रीय स्थरावर भरारी घेतली आहे.

- Advertisement -

कसा होता अनुभव?

या फेस्टिव्हलच्या अनुभवाविषयी बोलताना साळुंखे म्हणाले की, या फेस्टिव्हलचा अनुभव न विसरण्यासारखा आहे. कारण काही देशातील कलावंतांशी फक्त फेसबुकवर मैत्री होती, प्रत्यक्षात भेट नव्हती. या कार्यक्रमाच्यामार्फत त्यांना भेटता आले. या ठिकाणी भरपूर शिकायला मिळाले. थायलंडच्या परंपरा समजल्या. तेथील लोक आलेल्या पाहुण्यांचे कशाप्रकारे आदरातिथ्य करतात, त्यांची काळजी घेतात, ते पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वात जास्त आनंद झाला. कारण, वेगळ्याच पद्धतीने तो संपन्न झाला. कोणत्याही मोठ्या लोकांना न बोलवता, भाषणबाजी न करता हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात फक्त आयोजक आणि कलावंत होते. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी धमाल, मस्ती आणि रेन डान्स झाला. त्यानंतर सर्वांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. त्यामुळे हा फेस्टिवल आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचे साळुंखे म्हणाले.


हेही वाचा – आजच्या गुगल डुडलमध्ये ही बाहुली का दिसतेय? वाचा:

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -