घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत ३१ जणांवर गुन्हे दाखल

करोना व्हायरस : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत ३१ जणांवर गुन्हे दाखल

Subscribe

आतापर्यंत गुन्हे दाखल झालेल्या लोकांची संख्या ३१ इतकी झाली आहे.

करोनाबाबत देण्यात आलेल्या शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २४ तासांत २१ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत गुन्हे दाखल झालेल्या लोकांची संख्या ३१ इतकी झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने गेल्या काही दिवसांत अनेक महत्वाचे बंदी आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे कानाडोळा करत नागरिकांकडून त्याचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही नागरिक करोनाबाबत तितके जागरूक आणि सतर्क नसल्याचे दिसत आहेत. त्यामूळेच पोलीस प्रशासनाने सामाजिक सुरक्षेचा विचार करत कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. कल्याणातील महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये ९ जणांवर गुन्हे, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ नूसार एकावर, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात २ आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात ९ जणांवर असे एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २ दिवसांत गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांची संख्या ३१ वर पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -