कंगनाने पातळी सोडली, मुख्यमंत्र्यांना दिली रावणाची उपमा!

kangana ranaut share controversial memes on cm uddhav thackeray
कंगनाने पातळी सोडली, मुख्यमंत्र्यांना दिली रावणाची उपमा!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आता मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आपली पातळी सोडली आहे. पहिल्यांदा कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांना आव्हान केले होते. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. कंगनाने एका मिम्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. या मिम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात दिसत असून उद्धव ठाकरे रावणाच्या रुपात दिसत आहे. तसेच त्यांना दहा तोंडं दाखवली आहेत आणि त्यांच्या मागे जेसीबी दाखवला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेला मिम्सचा फोटो कंगनाने पोस्ट केला आहे. या मिम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई यांना युद्धात उतरण्यापूर्वी मानाची तलावर देताना दिसत आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता या फोटोवरून कंगनाने नवा वाद छेडलेला आहे.

विशेष म्हणजे कंगनाने या मिम्सचा फोटो शेअर करताना मराठीतून ट्विट केलं आहे. ती म्हणाली आहे की, ‘लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र’

 

 

यापूर्वी कंगनाने नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणाबाबत व्हिडिओ ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. याबाबत कंगना म्हणाली होती की, ‘महाराष्ट्रात सरकाराचा आतंक आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. आज एका माजी सैनिकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या बेदम मारहाण केली. एका माणसाला इतक्या लोकांनी मारहाण केली. त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी सरकारवर टीका केली होती.’


हेही वाचा – कलाकारांसाठी मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे – संजय राऊ