Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कंगनाने साधला शिवसेनेवर निशाणा; म्हणाली आता लढाई हायकोर्टात

कंगनाने साधला शिवसेनेवर निशाणा; म्हणाली आता लढाई हायकोर्टात

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनाला न्यायालयाने जोरदार झटका दिला असून सदनिकांचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियामांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. यावर कंगनाने ट्विट करत ‘महाविनाशकारी सरकारच्या खोट्या प्रचाराला बळी पडून मी हे फ्लॅट खरेदी केले आहेत. हे फ्लॅट खरेदी करताना त्या फ्लॅटची रचना ही तशीच होती. त्यामुळे मी हे फ्लॅट एकत्र केलेले नाही. विनाकारण मला पालिकेकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे आता ही लढाई हायकोर्टातच होईल’, असा घणाघात कंगनाने शिवसेनेवर केला आहे.

‘परवानगीशिवाय तीन फ्लॅट्स एकत्र’

- Advertisement -

उपनगर दिंडोशी येथील खटल्याच्या सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, ‘खार परिसरातील १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.’

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च २०१८ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण, त्यानंतर ही बाब मागे पडली होती.


- Advertisement -

हेही वाचा – Vaccination Dry Run : २०२१ वर्ष लसीकरणाच, वर्षभर चालणार लसीकरण – राजेश टोपे


- Advertisement -