घरदेश-विदेशमहापालिकेविरोधात कंगनाचा दोन कोटी रुपयांचा दावा

महापालिकेविरोधात कंगनाचा दोन कोटी रुपयांचा दावा

Subscribe

अभिनेत्री कंगना रानौतने मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने मुंबई महानगरपालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर सुरू झालेला वाद कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईपर्यंत पोहोचला. कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मंगळवारी (8 सप्टेंबर) मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम 354(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला 24 तासांची मुदत देण्यात आली होती. पण, तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने पालिकेकडून बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी तिथे तोडकामाला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या कार्यालयात 12 अनधिकृत बांधकामे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. त्याला विरोध करत कंगनाने अ‍ॅड. रिझवान सिद्दीकीमार्फत हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली.

- Advertisement -

परंतु या कारवाईविरोधात संतापलेल्या कंगनाने मुंबई महापालिकेला पुन्हा हायकोर्टात आव्हान दिले. मुंबई महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईदरम्यान दुर्मिळ सामानांचे, वस्तूंचे नुकसान केल्याचा आरोप कंगनाने केला आहे. एकूण मालमत्तेच्या 40 टक्के भागाचे नुकसान झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरुवारपर्यंत (17 सप्टेंबर) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. तर पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -