घरमहाराष्ट्रकन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

औरंगाबादमधील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. हतनूर येथे तीन तास रस्ता आडवल्यामुळे त्यांना ही अटक झाली आहे.

औरंगाबादमधील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. हतनूर येथे तीन तास रस्ता आडवल्यामुळे त्यांना ही अटक झाली आहे. पीक विमा कर्जासंदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच हातनूर रस्त्याच्या कामाबद्दल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन सुरु केले होते. शेतकऱ्यांनी पीक विमा लवकरात लवकर मिळावा तसेच हतनूर रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आज, मंगळवार सकाळपासून रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. जाधव यांनी सकाळी १० वाजल्यापासून रास्ता रोको सुरु केले. पोलिसांनी अनेक वेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण माजी आमदार जाधव यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर बराच वेळ रस्ता अडवल्यामुळे कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव 

औरंगाबादमधील कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मराठा आरक्षणावरून शिवसेनेला धारेवर धरणारे हर्षवर्धन यांनी आधीच औरंगाबादेतून लोकसभा लढविण्यासाठी दंड थोटपटले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘शिवस्वराज्य बहुजन पक्ष’ स्थापन करून लोकसभा लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेसकडून त्यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते. २००९ मध्ये हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कडून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय मिळवला होता. मात्र आरक्षणाच्या मुद्दानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -