घरदेश-विदेशऔरंगाबाद, मुंब्रा येथील संशयितांचे काश्मीर कनेक्शन

औरंगाबाद, मुंब्रा येथील संशयितांचे काश्मीर कनेक्शन

Subscribe

औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेट या संघटनेच्या १० संशयितांचे थेट कनेक्शन काश्मीर येथील एका दहशतवादी संघटनेशी असून, अटकेत असलेल्या काही जणांच्या बँक खात्यातून या दहशतवादी संघटनेला आर्थिक रसदही पुरवण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर येत आहे. मात्र, एटीएसच्या अधिकार्‍यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. अटकेत असलेल्या या संशयितांना गुरुवारी औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची आणखी ४ दिवस पोलीस कोठडी वाढवण्यात आली.

जानेवारी महिन्यात दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद आणि मुंब्रा येथून ११ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांकडून एटीएसने मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य, विषारी पावडर, आक्षेपार्ह कागदपत्रे, मोठ्या प्रमाणात हार्ड डिस्क, लॅपटॉप, सिडी, डीव्हीडी आणि पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या १० जणांमध्ये २ जण केमिकल इंजिनीयर तर एक जण फार्मासिस्ट आहेत. अटक करण्यात आलेल्या या संशयितांकडून मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी महत्त्वाच्या कार्यक्रमात अन्न आणि पाण्यातून रासायनिक हल्ला तसेच काही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रसादातून विषप्रयोग करण्याचा कट होता. मात्र, वेळीच अटक करून त्यांचा हा कट उधळून लावण्यात आला होता.

- Advertisement -

एटीएसकडून अटक करण्यात आलेल्या संशयितांची बँक खाती गोठवण्यात आली होती, त्यांची बँक खाती तपासण्यात आली असता एक धक्कादायक वृत्त समोर आले. अटकेत असलेल्या काही जणांच्या खात्यातून काश्मीर येथील बंदी घातलेल्या एका संघटनेला आर्थिक रसद पुरवण्यात आली असल्याचे लक्षात आले आहे. एटीएसच्या तपास अधिकार्‍यांनी काश्मीर पोलिसांकडे संपर्क साधून याबाबतची सर्व माहिती मिळवली असून, त्या माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हे आहेत संशयित दहशतवादी
मोहसीन सिराजुद्दीन खान (३२, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (२३, कैस कॉलनी), महंमद सरफराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२३, राहत कॉलनी), महंमद तकी उर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (२०, कैसर कॉलनी) एक विधिसंघर्ष बालक, ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (३२, मुंब्रा ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (२८, मोतीबाग, मुंब्रा ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (२१, मुंब्रा ठाणे) तलहा उर्फ अबुबकर हनिफ पोतरिक रा मुब्रा, असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अटकेत असलेल्या या संशयितांना गुरुवारी औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची आणखी ४ पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -