घरCORONA UPDATEवयोवृद्ध, दिव्यांगांसाठी केडीएमसीची हेल्पलाईन; आवश्यक वस्तू मिळणार घरपोच

वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी केडीएमसीची हेल्पलाईन; आवश्यक वस्तू मिळणार घरपोच

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व वयोवृध्दांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या हेतूने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, वयोवृध्द व दिव्यांग नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने त्यांच्या सोयीसाठी प्रभाग क्षेत्रानुसार हेल्पलाईन सुरू करून अत्यावश्यक वस्तू त्यांना घरपोच केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे वयोवृध्द व दिव्यांग नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: विश्रामगृहे, वसतीगृहात ५५ हजार खाटांची व्यवस्था

शहरात अनेक दिव्यांग व वयोवृध्द नागरिक राहतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या हेतूने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध, दिव्यांग नागरिकांसाठी महापालिकेने प्रभाग क्षेत्रानूसार हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना किराणा सामान, औषधे आदी गरजेच्या वस्तुंचा घरपोच पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तींना केवळ ते राहत असलेल्या प्रभाग क्षेत्रानुसार दिलेल्या व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. या वस्तू दुपारी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरपोच मिळणार असून १४ एप्रिलपर्यंत ही सुविधा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रभागक्षेत्र आणि त्यांचे व्हॉटस् अप नंबर

1) ए प्रभागक्षेत्र – ९८२०५४७४९७
2) बी प्रभागक्षेत्र – ७०२१४०८२२३
3) सी प्रभागक्षेत्र – ८४१५८४२४२०
4) डी प्रभागक्षेत्र – ९८२११६०९२९
5) आय प्रभागक्षेत्र – ८४५२८९८९३९
6) एफ प्रभागक्षेत्र – ८३५५६०६१२३६
7) जी प्रभागक्षेत्र – ९०८२३७८०१०
8) एच प्रभागक्षेत्र – ७७९६१२१८८८
9)आय प्रभागक्षेत्र – ९७०२१०७४०५
10) जे प्रभाग क्षेत्र- ९७६९२१०९९९

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -