घरमहाराष्ट्रकेनियाचा खासदार २०० रुपये परत देण्यासाठी आला ३० वर्षांनी भारतात

केनियाचा खासदार २०० रुपये परत देण्यासाठी आला ३० वर्षांनी भारतात

Subscribe

केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी हा तब्बल ३० वर्षानंतर २०० रुपयांची उधारी परत करण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्याची घटना घडली आहे.

अवघ्या २०० रुपयांची उधारी परत करण्यासाठी एखादा माणूस परदेशातून येतो तेही तब्बल ३० वर्षानंतर… ऐकून अजब वाटतंय ना. आजच्या जगात कोण इतकं प्रामाणिक राहतं… असा विचार करत असाल ना… पण असं घडलंय. केनियाच्या एका खासदाराने हे उदाहरण समोर ठेवले आहे. केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी हा तब्बल ३० वर्षानंतर २०० रुपयांची उधारी परत करण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्याची घटना घडली आहे. सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम होती. खायची अडचण असताना एका माणसाने त्यांना मदत केली होती. त्याची त्यावेळची २०० रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आला.

तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक होते.

- Advertisement -

रिचर्ड यांना त्यावेळी काशिनाथ गवळी यांनी मदत केली. रहायला घर मिळाले, इतकंच नव्हे, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. १९८९ मध्ये त्याने औरंगाबाद सोडले त्यावेळी काशिनाथ काकांकडे २०० रुपयांची उधारी बाकी राहिली होती. तिच उधारी रिचर्ड यांनी आता परत केली आहे.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांसोबत पूजा? असं काहीही नाही! – उद्धव ठाकरे

- Advertisement -

मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -