घरदेश-विदेशकेरळमधील १०० सदस्यांचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल

केरळमधील १०० सदस्यांचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल

Subscribe

केरळमधील १०० सदस्यांचं वैद्यकीय पथक महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याची माहिती केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिली.

केरळमधील डॉक्टर, परिचारिका यांचे एक पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचाचा आकडा ६० हजारांच्या पुढे गेला आहे. केरळने राज्यात कोरोनावर नियंत्रण ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्राने केरळच्या डॉक्टर्स आणि परिचारकांचं पथक महाराष्ट्रात मदतीसाठी पाठवावं अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देत मदतीसाठी केरळमधील १०० सदस्यांचं वैद्यकीय पथक महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मुंबईतील डॉक्टरांना मदत करण्यासाठी केरळमधील डॉक्टर आणि परिचारिकांची १०० सदस्यांची वैद्यकीय टीम मुंबई येथे पोहोचली आहे. अॅडव्हान्स टीम यापूर्वीच हिल्स रुग्णालयात पोहोचली आहे.” महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार कोरोनाशी लढण्यासाठी मदत करण्यासाठी वैद्यकीय पथक पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

२५ मे रोजी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (Directorate of medical education and research) केरळ सरकारला एक पत्र लिहून वैद्यकीय पथक पाठविण्याची विनंती केरळ सरकारला केली होती. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे डॉ. तात्याराव लहाने एएनआय या वृत्तसंस्थएशी बोलताना म्हणाले, “कोविड-१९ चे रुग्ण सतत वाढत आहेत आणि त्यामुळे राज्याच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर विशेषत: मनुष्यबळाच्या कमतरतेवर प्रचंड दबाव आला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरुच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -