पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण १००% भरले

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला हे धरण शंभर टक्के भरल्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा गंभीर प्रश्न आता सुटला आहे.

Khadakwasla dam of pune city overflowing
खडकवासला धरण १००% भरले

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला होता. धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट आले होते. मात्र, आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा गंभीर प्रश्न आता सुटल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण भरले आहे. तसेच धरण भरल्यामुळे मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.