घरमहाराष्ट्रमहाजनादेश यात्रेत खडसेंना भाषणाची देखील संधी नाही

महाजनादेश यात्रेत खडसेंना भाषणाची देखील संधी नाही

Subscribe

खान्देशात भाजपचे वटवृक्ष झाले आहे. खान्देशात सर्वाधिक प्रमाणात भाजपचेच आमदार आणि खासदार आहेत. भाजप पक्षाचे बीज पेरण्याचे महत्त्वपूर्ण काम एकनाथ खडसे यांनी केले. मात्र, आज त्यांनाच पक्ष डावलत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची राज्यभर महाजनादेश यात्रा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची जळगावच्या सागर पार्क येथे शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांना भाषण करण्याची संधी मिळाली. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाषण करण्याची देखील संधी मिळाली नाही. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या खुर्चीत भरपूर अंतर ठेवण्यात आले होते. खडसे यांना देण्यात आलेल्या दुय्यम वागणुकीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत खडसे अर्धा तास ताटकळत बसले व्यासपीठावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी संध्याकाळी दीड वाजता येणार होते. मात्र, ते संध्याकाळी चार वाजता आले. त्यांच्या येण्याअगोदर खडसे व्यासपीठावर अर्ध्या तासापासून ताटकळत वाट पाहत होते. कार्यक्रमात आणदार सुरेश भोळे आणि गिरीश महाजन यांनी भाषण केले. मात्र एकनाथ खडसे यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही. खान्देशात भाजप पक्षाचा विस्तार करण्यात एकनाथ खडसे यांची महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. मात्र, खान्देशात सध्या सुरु असलेले राजकीय वातावरण पाहता भाजप पक्ष खडसेंची कामगिरी विसरल्याचे पाहायला मिळत असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -