घरताज्या घडामोडीयेवल्यातील डोंगरगावात काळवीटाची हत्या; आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता, एक ताब्यात  

येवल्यातील डोंगरगावात काळवीटाची हत्या; आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता, एक ताब्यात  

Subscribe

येवला तालुक्यातील डोंगरगावातील शेतात जाळे टाकून काळवीटाला पकडून त्याच्या डोक्यात दगड टाकून शिकार करण्यात आली आहे. वन विभागाने एका अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. मधुकर शिवाजी पवार (रा. बिलवणी, ता. वैजापूर जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, येवला तालुक्यातील डोंगरगावातील शेतात काळवीटाला पकडण्यासाठी जाळे लावले होते. मंगळवारी (दि.११) दुपारी चारच्या सुमारास जाळ्यात काळवीट अडकल्यानंतर मधुकर पवार याने काळवीटाच्या डोक्यात दगड टाकून ठार केले. यावेळी वनविभागाच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. मधूकर पवार याचे इतर साथीदार फरार झाले. पथकात वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम.बी.पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, विलास देशमुख यांनी सापळा रचून पवार याला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. पवार याला वनविभागाने ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

येवला तालुक्यातील काळवीट शिकारीची पहिलीच घटना आहे. ठार केलेले काळवीट नर असून ते तीन वर्षाचे आहे. यामागे आतंरराष्ट्रीय तस्कर टोळी असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने कसून तपास सुरू आहे.
संजय भंडारी वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -