घरमहाराष्ट्रउत्साहाच्या भरात सरपंचांचा हवेत गोळीबार!

उत्साहाच्या भरात सरपंचांचा हवेत गोळीबार!

Subscribe

दिवाळीच्या उत्साहात कोल्हापूरच्या शिरोली गावच्या सरपंचांनी हवेत गोळीबार केला.

दिवाळीला फटाके फोडण्याचा आनंद आगळावेगळा असतो. लहान मुलांपासून ते तरुण मंडळी आनंदाने फटाके फोडत असतात. काही लोक फटाक्यांचे रॉकेटही फोडत असतात. परंतु, कोल्हापुरच्या शिरोली गावचे सरपंच शशिकांत खवरे यांनी दिवाळीच्या आनंदाला वेगळ्या तऱ्हेने साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फटाके फोडण्याच्या एवजी दिवाळीच्या उत्साहात हवेमध्ये गोळीबार केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांचा हवेतील गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हाटसअॅपवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दादरच्या फुलमार्केटमध्ये गोळीबार, एक ठार

- Advertisement -

खवरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

शशिकांत खवरे हे शिरोलीमध्ये बिनविरोध सरपंच म्हणूनु निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा शिरोलीमध्ये दरारा आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास खवरे यांनी हवेत केलेल्या गोळीबारामुळे त्यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी उत्साहच्या भरात डबलबारी बंदूक आणि पिस्तूलमधून हा गोळीबार केला होता. त्यांनी भररस्त्यावर केलेल्या या कृत्यामुळे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उत्साहच्या भरात त्यांच्याकडून असे कृत्य झाल्याचे खवरे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. शिवाय, खवरे यांनी गोळीबार केलेल्या शस्त्रांचा परवाना त्यांच्याकडे असल्याचाही दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.


हेही वाचा – बिल्डरचा निवासी सोसायटी अध्यक्षावर गोळीबार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -