नाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘शापित माणसांचे गुपित’ प्रथम तर भांडूपचे ‘आय अ‍ॅग्री’ व्दितीय

कोकण परिक्षेत्राअंतर्गत नाट्य स्पर्धेत महावितरणच्या नाशिक परीमंडळाच्या ‘शापित माणसांचे गुपित ’ या नाटकाने प्रथक क्रमांक पटकावत सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले.

कोकण प्रादेशिक आंतरपरिमंडळीय नाट्य स्पर्धा

अहमदनगर येथे ५ नोव्हेंबरपासून माऊली सांस्कृतिक सभागृहात सुरु असलेल्या कोकण परिक्षेत्राअंतर्गत नाट्य स्पर्धेचा काल, गुरुवारी समारोप झाला. या स्पर्धेत महावितरणच्या नाशिक परीमंडळाच्या ‘शापित माणसांचे गुपित ’ या नाटकाने प्रथक क्रमांक पटकावत सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले. भांडूप परिमंडळाच्या ‘आय अ‍ॅग्री’या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला.

कोकण परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, उप महाव्यवस्थापक अनिल बराटे, सुनील पाठक, योगेश खैरनार, राम गोपाल अहिर, अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली, नाट्य परीक्षक पुरुषोत्तम देशपांडे, रितेश साळुंके डॉ. धनश्री खरवंडीकर, संजय कळमकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन ईश्वर पाटील आणि राजेंद्र धाडगे यांनी केले. तर आभार अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी मानले. स्पर्धेकरीता सांघिक कार्यालय मुंबई, नाशिक, जळगाव, कल्याण आणि भांडूप परिमंडळातील वरीष्ठ अधिकारी व नाटयरसिक उपस्थित होते.

सर्वोत्तम नाटक
प्रथम – ‘शापित माणसांचे गुपित’ – नाशिक परिमंडळ
व्दितीय – ‘ आय अग्री’ – भांडूप परिमंडळ

दिग्दर्शन
प्रथम – ‘शापित माणसांचे गुपित – रेणुका भिसे
व्दितीय – आय अॅग्री – डॉ. संदीप वंजारी

अभिनय (स्त्री)
प्रथम – ‘तुने मारी एन्ट्री’ लतिका पालव (भांडूप परीमंडळ)
व्दितीय – ‘शापित माणसांचे गुपित – रेणुका भिसे (नशिक परिमंडळ).

अभिनय (पुरूष)-
प्रथम – आय अॅग्री – डॉ. संदीप वंजारी (भांडूप परीमंडळ)
व्दितीय – अर्जुन कि अभिमन्यू- किशोर साठे (सांघिक कार्यालय, मुंबई)

नेपथ्य
प्रथम – ‘आय अॅग्री – महेंद्र चुनारकर,
व्दितीय – शापित माणसांचे गुपित – राजेंद्र घोरपडे

प्रकाश योजना
प्रथम – शापित माणसांचे गुपित – हेमंत पेखळे
व्दितीय – आय अग्री – अविनाश शेवाळे

पार्श्वसंगीत
प्रथम – मुक्ती – चेतन सोनार
व्दितीय – शापित माणसांचे गुपित – निलेश ठाकूर

बालकलाकार 
अर्जुन की अभिमन्यू – भार्गवी शिंदे
शापित माणसांचे गुपित – अनुष्का भिसे व ऋतुजा पिसे

हेही वाचा –

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, तुम्ही निश्चिंत राहा’; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना