घरताज्या घडामोडी'मुंबई - पुणे' दरम्यान कोयना एक्स्प्रेस रद्द

‘मुंबई – पुणे’ दरम्यान कोयना एक्स्प्रेस रद्द

Subscribe

'मुंबई - कोल्हापूर' असा कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३० जानेवारीपर्यंत पर्यायी मेल - एक्स्प्रेसने प्रवास करावा लागणार आहे.

‘मुंबई – कोल्हापूर’ असा कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनकरता एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पुढील दहा दिवस ‘मुंबई – कोल्हापूर’ असा कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मेल – एक्स्प्रेसने प्रवास करावा लागणार आहे. मंकी हिल आणि कर्जत स्थानका दरम्यान घाट मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु असल्याने ३० जानेवारीपर्यंत १२ मेल – एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.

या एक्स्प्रेस रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरला जाण्यासाठी कोयना एक्स्प्रेस ही महत्त्वाची गाडी आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांची नेहमीच पसंती आणि गर्दी असते. मात्र, घाटमार्गात सुरु असलेल्या दुरुस्ती कामांमुळे ट्रेन क्रमांक ११०२९/११०३० सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस ‘मुंबई-पुणे’ दरम्यान ३० जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहे. पुणे स्थानकापासून कोल्हापूरपर्यंत ही एक्स्प्रेस चालवण्यात येईल, अशी महिती मध्य रेल्वेने दिली. कोयना एक्स्प्रेससह पनवेल-पुणे-पनवेल, सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर, सीएसएमटी-विजापूर-सीएसएमटी पॅसेंजर, दौंड-साई नगर शिर्डी-दौंड पॅसेंजर या गाड्या ३० जानेवारीपर्यंत रद्द राहणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ग्रेड’ हुकल्यास अकरावी, बारावीचे विद्यार्थी अनुत्तीर्ण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -