घरमहाराष्ट्रतब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन

तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन

Subscribe

लालबागच्या राजाचे आज विसर्जन झाले. अरबी समुद्रात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या लालबाग राजाचे आज सकाळी ९ वाजता कोळी बांधवांच्या हस्ते मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’! हा एकच जल्लोष गिरगावच्या चौपाटीवर घुमत होता. बाप्पा निघाले गावाला…चैन पडेना आम्हाला असे म्हणंत सालाबादप्रमाणे यंदाही कोळी बांधवांना मान देत पारंपरिक पद्धतीने कोळी पोषाख करत आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेतला. गेल्या १० दिवसांपासून मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच गजर होता आणि तो म्हणजे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’! लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं एकच जयघोष होत होता. अवघी मुंबापुरी लालबाग राजाच्या उत्साहाने न्हाऊन निघाली होती.

२० तास चालू होती मिरवणूक

गणेशचतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाची मनोभावे पूजाआर्चा केल्यानंतर सोमवारी वाजत गाजत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाच मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. रविवारी १० वाजता बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकी दरम्यान कोळी बांधवाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळी महिलांनी बाप्पा समोर नृत्य सादर करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.


लालबागच्या राजाच्या निरोपाआधी कोळी बांधवांचे खास गाणं | कोळी बांधवाने पारंपारिक पद्धतीने केले नृत्य सादर

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -